वाशिम - राज्यभरात गौराईचा सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने गौराईच्या मूर्तींची पूजा करून साजरा केला जातो. मात्र वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने यांनी आपल्या दोन सूनांनाच गौराई म्हणून तीन दिवस पूजा करीत हा सण साजरा केला आहे. त्यामुळे त्यांनी सुनामध्येच गौराई बघून केलेल्या या वेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सुनांचीच गौराईच्या जागी केली पूजा -
वाशिम शहरातील ड्रीम लॅन्ड सिटी येथे राहणार्या सिंधुबाई सोनुने यांनी गौरी पूजन सोहळा आपल्या रेखा व पल्लवी या दोन्ही सुनांची पूजा करून त्यांना देवी स्वरुपात समजून साजरा केला. त्यांनी जीवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहळा साजरा करून समजा पुढे आदर्श निर्माण केला. हा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत.
सासू सुनातील जिव्हाळा कायम राहावा -