वाशिम - यंदाच्या खरीप हंगामामध्ये पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे.
पावसामुळे शेतातील हिरव्या सोयाबीन शेंगांना अंकुर फुटल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट होणार असून त्यांच्या आर्थिक संकटात भर पडणार आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
अतिपावसाने पिक हातचे जाण्याची भीती वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु, मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला. परंतु, दुबार पेरणी केल्यावर मूग, उडीद पिकांना बऱ्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी समाधानी झाला. परंतु, मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसामुळे तोडणीस आलेल्या मूग, उडीद पिकांच्या शेंगांना मोड फुटले असल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला असल्याने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, घरी सिलेंडर नेणाऱ्यांच्या संख्येतही भर
हेही वाचा -राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण