वाशिम - शहरातील सायकलपटू नारायण व्यास यांनी सायकल क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या ७ दिवसात त्यांनी वाशीम ते रामसेतू ही २००० किमी अंतर पार केले आहे. व्यास यांनी हे आपले कार्य अभिनेता सोनू सूदच्या लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या समाज कार्याला अर्पण केले आहे.
सोनू सूदसाठी २००० किमी सायकल चालवणारा 'अवलिया'! - नारायण व्यास वाशिम लेटेस्ट न्यूज
जेवण आणि अल्पोपहारात वेळ खर्च होऊ नये, म्हणून सायकल यात्रेदरम्यान बॅकअप व्हॅनची देखील सुविधा करण्यात आली होती. राजू होळपदे आणि सौरभ व्यास या दोन तरुणानी बॅकअप पुरविण्याचे कार्य केले.
५ राज्यांमधून प्रवास
७ फेब्रुवारी रोजी सकाळी वाशीमहून सुरू केलेल्या सायकल यात्रेदरम्यान व्यास यांनी ५ राज्यातून प्रवास केला आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रामसेतू येथे पोहचले. भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे वाघा बॉर्डरपर्यंत व्यास यांनी सायकलने प्रवास केला आहे. जेवण आणि अल्पोपहारात वेळ खर्च होऊ नये, म्हणून सायकल यात्रेदरम्यान बॅकअप व्हॅनचीदेखील सुविधा करण्यात आली होती. राजू होळपदे आणि सौरभ व्यास या दोन तरुणानी बॅकअप पुरविण्याचे कार्य केले.
सोनू सूदकडून शुभेच्छा
नारायण व्यास यांनी दक्षिणेची स्वारी फत्ते केल्याने वाशिमकरांची छाती पुन्हा एकदा अभिमानाने भरली आहे. वाशीम ते रामसेतू हा जवळजवळ २००० किमीचा प्रवास सायकलने यशस्वी पूर्ण केल्याबद्दल अभिनेता सोनू सूदने व्यास यांना व्हिडियोद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.