वाशिम - पीक कर्ज वाटपासाठी शेतकरी यांच्याकडून फेरफार नक्कल, जुना सात - बारा नक्कलची बँकेकडून सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे दररोज शेतकऱ्यांची कागदपत्रे जुळवण्यासाठी वाशिम जिल्ह्यात सर्वच तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तहसील, भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - तहसील ऑफिस वाशिम
पीक कर्जासाठी लागत असलेल्या कागदपत्रांसाठी तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
तहसील, भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी
पीक कर्जासाठी लागत असलेल्या कागदपत्रांसाठी तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगबाबत प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.