महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : निर्बंध शिथील झाल्यानंतर पाटणी चौकात नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - वाशिम पाटणी चौकात नागरिकांची गर्दी

आजपासून सकाळी 7 दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेतल नागरिकांनी बाजारपेठेत तुफान गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे बघायला मिळाले.

Crowd of citizens at Patni Chowk in washim
वाशिम : निर्बंध शिथील झाल्यानंतर पाटणी चौकात नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By

Published : Jun 7, 2021, 3:52 PM IST

वाशिम -आजपासून राज्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावलीत जाहिर केली. त्यानुसार आजपासून सकाळी 7 दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेतल नागरिकांनी बाजारपेठेत तुफान गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे बघायला मिळाले.

नागरिकांची गर्दी

बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी -

आज पहाटेपासून पाटणी चौक येथे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. संधी दिली की त्याचा गैरफायदा घेतल्या जात आहे. लोक विनाकारण घराबाहेर पडतात. गर्दी करतात, हे आज पुन्हा एकदा दिसून आले. आज निर्बंध शिथील केल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले. यावेळी खबरदारीच्या उपाययोजना व नियमाचे उल्लंघन होतांना दिसेल. यावेळी बहुतांश नागरिकांनी मास्क घातले नसल्याचे दिसून आले. तसेच सुरक्षित अंतरदेखील पाळण्यात आले नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत , त्याला एक प्रकारे नख लावण्याचे काम नागरिकांकडूनच सुरू असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - पुढील ३ तासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता, रात्री काही भागांत झाला जोरदार पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details