वाशिममध्ये समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाचा साठा करण्साठी खोदलेल्या शेततळ्यामुळे पिकांचे नुकसान - farmer Compensation
समृद्धी महामार्गावर काम पीएनसी या कंपनीच्या मार्फत कारंजा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कंपनीच्यावतीने गौण खनिजसाठ्यासाठी शासनाच्या इ-क्लास जमिनीवर शेततळे खोदण्यात आले आहे.
![वाशिममध्ये समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाचा साठा करण्साठी खोदलेल्या शेततळ्यामुळे पिकांचे नुकसान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4555256-343-4555256-1569445706968.jpg)
शेतात साचलेलं पाणी
वाशिम: गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या प्रवासातील पाऊस कमी - अधिक प्रमाणात बरसत आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतालगतचा समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजसाठा साठी खोदलेले शेततळे पाण्याने तुडुंब भरल्याने या शेततळ्यातील पाणी शेतात गेले. त्यामुळे परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे..
शेतातील पिकांचं नुकसान झाल्यानं भरपाईची मागणी करताना शेतकरी