महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट; काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान - गारपिटीमुळे पिकांचे नुकसान

जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास मंगरुळ पीर तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाने गारांसह हजेरी लावली. या गारांच्या पावसात भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

washim hail
वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट

By

Published : Mar 21, 2021, 7:38 AM IST

Updated : Mar 21, 2021, 8:10 AM IST

वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी देखील गारपीटीने हा भाग झोडपून निघाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुिकसान झाले आहे.

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट

ऐन सुगीत शेतकऱ्यांना फटका-


हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास मंगरुळ पीर तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाने गारांसह हजेरी लावली. या गारांच्या पावसात भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ऐन सुगीच्या दिवसात आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरवला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी गारपीट;

रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान-

सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीचा कालावधी आहे. यापूर्वी सोयाबीनचे नुकसान सोसल्यानंतर आता या गारपीटीने गहू, ज्वारी हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री वादळ वारे सुटले आणि पावसासह प्रचंड गारपीट झाली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील तिवळी, वसारी, घाटा मिझापूर, दुधाळा, किनी घोडमोड शेलगाव बागडे वाघी, करंजी डोंगरकिन्ही, मुंगळा, पांगरखेडा, चांडस, गौळखेडा, धारपिंपरी, एकांबा , शिरपूरसह अनेक गावातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
Last Updated : Mar 21, 2021, 8:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details