वाशिम- अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करिता पीक कर्ज वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७ शाखांमधील ७१७ सभासदांना ५ कोटी १९ लाख ९ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात ७१७ सभासद शेतकऱ्यांना ५ कोटींचे पीक कर्ज वाटप - ५ कोटींचे पीक कर्ज
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामरगाव शाखा कार्यालयात पात्र सभासद शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.

पीक कर्ज वाटप
शेतकऱ्यांना ५ कोटींचे पीक कर्ज वाटप
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामरगाव शाखा कार्यालयात पात्र सभासद शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. कारंजा तालुक्यात कारंजासह कामरगाव, मनभा, उंबर्डा बाजार, काजळेश्वर, पोहा व धनज अशा ७ ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जाळे पसरले असून, स्थानिक सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पात्र शेतकरी सभासदांना दरवर्षी खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात येते.