महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘होम आयसोलेशन’ नियमाचे उल्लंघन प्रकरणी कामरगाव येथील एका व्यक्तीवर गुन्हा - ‘होम आयसोलेशन’ नियमाचे उल्लंघनकेल्याने गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारंजा तालुक्यात विशेष मोहीम राबवून होम आयसोलेशनममधील रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी‘होम आयसोलेशन’ नियमाचे उल्लंघन प्रकरणी कामरगाव येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against a person from Kamargaon for violating Home Isolation Rules
‘होम आयसोलेशन’ नियमाचे उल्लंघन प्रकरणी कामरगाव येथील एका व्यक्तीवर गुन्हा

By

Published : Mar 12, 2021, 9:41 PM IST

वाशिम - गृह अलगीकरणमध्ये (होम आयसोलेशन) ठेवण्यात आलेल्या रुग्णांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारंजा तालुक्यात विशेष मोहीम राबवून होम आयसोलेशनममधील रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कामरगाव येथील एका कोरोना बाधिताने होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची आरोग्य स्थिती चांगली असेल व घरामध्ये स्वतंत्र राहण्याची सुविधा असल्यास त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, त्यांनी होम आयसोलेशन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कारंजा तालुक्यामध्ये होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांकडून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी गुरुवार, ११ मार्चला उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रभारी पोलीस उपअधीक्षक अनिल ठाकरे, तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी कालिदास तापी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या पथकांनी शहरी व ग्रामीण भागात अचानक गृहभेटी देवून तपासणी केली. यामध्ये कामरगाव येथील एक व्यक्ती होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सक्तीने कारंजा येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे.

‘होम आयसोलेशन’ नियमांचे पालन करा -

आपल्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होवू नये, यासाठी होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत तपासणी करण्यासाठी प्रशासनामार्फत अचानक गृहभेटी देवून तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या तपासणीत एका व्यक्तीकडून होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही शहरी व ग्रामीण भागात अचानक तपासणी करून होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात केली जाणार आहे, असे कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details