वाशिम- जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उज्वलनगर येथे शनिवारी गोठ्याला आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागली होती.
मानोरा तालुक्यात शेतातील गोठ्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान - fire broke out at cowshed
शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत शेती अवजारे, सागवाणी दरवाजे जळाले. दोन बैल आगीमुळे भाजले आहेत, तर 9 बोकडांचा होरपळून मृत्यू झाला.
शेतातील गोट्याला भीषण आग
मानोरा तालुक्यातील ऊज्वलनगर येथील शेतकरी विनय पाचुसिंग पडवाल यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या भीषण आगीत ७० हजार रुपये किंमतीचे दोन बैल भाजले गेले. ९ बोकडांचा होरपळून मृत्यू झाला.
या आगीत शेतीचे साहित्य,सागवानी दरवाजे असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.