वाशिम - दिवाळी गोवर्धन पूजेनिमित्त गाईंची वाजतगाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा ग्राम उंबर्डा बाजार येथे आजही कायम आहे. आज गाईंची सर्व गावांमधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. शेकडो वर्षांपासून ग्राम उंबर्डा बाजार येथे लक्ष्मी पुजनाच्या दुस-या दिवशी गोवर्धनपूजा करण्यात येते. यावेळी गाईंची मोठी मिरवणूक काढली जाते. यानिमित्ताने गोपालक सकाळीच गाईंना स्वच्छ धुऊन त्यांना फुलांच्या हारांनी सजवून नैवेद्य दाखवतात.
दिवाळी गोवर्धनपूजा थाटात साजरी... गाईंच्या मिरवणुकीची परंपरा कायम - cow prayers in washim
दिवाळी गोवर्धन पूजेनिमित्त गायींची वाजतगाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा ग्राम उंबर्डा बाजार येथे आजही कायम आहे. आज गाईंची सर्व गावांमधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
![दिवाळी गोवर्धनपूजा थाटात साजरी... गाईंच्या मिरवणुकीची परंपरा कायम cow worship tradition in washim](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9552387-875-9552387-1605446036535.jpg)
शेकडो वर्षांची परंपरा कायम
यानंतर सर्व गाई एकत्र आणल्या जातात. प्रमुख गुराख्यांच्या मार्गदर्शनात गावातील प्रमुख मार्गांवरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक जात असताना गावच्या मानाच्या हनुमान मंदिराला गाईंच्या कळपाची प्रदक्षिणा पाहण्याचा सोहळा विलोभनीय असतो. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होते. मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी सजवून ठिकठिकाणी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीचा समारोप भाजी बाजार चौकात करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.