वाशिम -कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून आज वाशिम जिल्ह्यातील 3 ठिकाणी ड्राय रन घेण्यात येत आहे. वाशिम सामान्य रुग्णालयात, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा तीन ठिकाणी हा ड्राय रन पार पडत आहे. कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनमध्ये 9 ते 12 या तीन तासात प्रत्येक सेंटरवर 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
या ड्राय रनद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम होणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी को-इन हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. याद्वारे या सर्व कार्यप्रणालीची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.