महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयसोलेशन कक्षात दाखल तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ - washim corona

एकमेव कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचारानंतर त्याचे अहवाल निगेटिव्ह आले. सदर व्यक्तीला २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित व्यक्ती नाही, असे डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.

आयसोलेशन कक्षात दाखल तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
आयसोलेशन कक्षात दाखल तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

By

Published : Apr 30, 2020, 7:12 PM IST

वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलेल्या तीन व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने काल, २९ एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित व्यक्ती नाही.

अमरावती येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती, वसई-पालघर येथून जिल्ह्यात आलेली एक व्यक्ती आणि ताप व खोकला अशी लक्षणे असलेली एक व्यक्ती अशा एकूण तीन व्यक्तींना काल जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबतचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात सध्या ५५ व्यक्तींना गृह विलगीकरणात तर १४ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ४९ घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४८ अहवाल निगेटिव्ह आले तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एकमेव कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचारानंतर त्याचे अहवाल निगेटिव्ह आले. सदर व्यक्तीला २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित व्यक्ती नाही, असे डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details