महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगरूळपीर आगारातील 20 कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह - Mangrulpeer Depot employees Corona News

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून, आज आलेल्या अहवालामध्ये मंगरूळपीर आगारातील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.

By

Published : Mar 2, 2021, 5:26 PM IST

वाशिम - जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून, आज आलेल्या अहवालामध्ये मंगरूळपीर आगारातील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे. चालक, वाहक, आगार कर्मचारी, असे एकूण 20 कर्मचारी पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कात आलेले प्रवासी बाधित निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती देताना कामगार सेनाचे सचिव राजेंद्र बाराभाई

हेही वाचा -पूजा चव्हाण प्रकरण: फडणवीसांसह भाजपच्या या नेत्यांविरुद्ध दाखल तक्रार मागे

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बस फेऱ्या सुरूच असल्याने वाशिम, कारंजा, मनोरा, मंगरूळपीर, मालेगाव व रिसोड बसस्थानकांत गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी संचारबंदी लागू केली असली, तरी दुसरीकडे बस सेवा सुरू असल्यामुळे गर्दी होत असून कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.

वाशीम जिल्ह्यात दररोज शंभरच्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये बस सेवा हा चिंतेचा विषय बनला आहे.

हेही वाचा -पोहरादेवी येथील सर्व महंतांची कोविड तपासणी करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details