महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्पेशल : बकरी ईदला कोरोनाचा फटका; बकरे विक्री थंड.. खाटीक समाज अडचणीत

राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन बरोबरच कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे लोकांना एकत्र येण्यास पायबंद बसला. याचा फटका छोटया-मोठ्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना बसला.

khatik samaj
खाटीक समाज अडचणीत

By

Published : Jul 31, 2020, 9:32 PM IST

Updated : Aug 7, 2020, 4:18 PM IST

वाशिम- बकरी ईदसाठी मुंबई, पुणे आणि हैदराबाद शहरात बकरे विकून दोन पैसे कमावण्यासाठी जात असलेल्या वाशिम जिल्ह्यातील खाटीक समाजातील व्यावसायिकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. त्यातच आता बकरी-ईदसाठी खरेदी केलेले जनावरे जिल्हाबंदीच्या नियमांमुळे विकता येत नसल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.

बकरे विक्री थंड.. खाटीक समाज अडचणीत

राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन बरोबरच कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे लोकांना एकत्र येण्यास पायबंद बसला. याचा फटका छोटया-मोठ्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना बसला. यात खास करून खाटीक दुकानदारांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे पहायला मिळाले.

त्यातच आता बकरी ईदलासुद्धा त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. मागच्या वर्षी बकरी ईदमध्ये वाशिम जिल्ह्यातील खाटीक समाजातील व्यापाऱ्यांना बकरे विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले होते. मात्र, मागच्या वर्षीचा फायदा पाहून अनेक व्यापाऱ्यांनी यावर्षीही आता कोरोनाकाळात बकरी ईदसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी केले होते. मात्र मुंबई, पुणे व हैदराबादसारख्या शहरात जाण्यासाठी पास मिळत नसल्याने हे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून ती आता अंगावर पडणार आहेत.

ईदसाठी एक दिवस शिल्लक राहिले असूनही जनावरे नेण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने जवळ असलेल्या पैशांची गुंतवणूक करून घेतलेल्या जनावरांचे काय करावे? असा प्रश्न खाटीक समाजातील व्यावसायिकांना पडला आहे.

Last Updated : Aug 7, 2020, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details