महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये कंटेनर अन् अल्टोची समोरासमोर धडक, २ ठार - पियुष गजानन घोगरे

वाशिममधील कारंजा-मुर्तीजापूर मार्गावर कंटेनर अन् अल्टोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाले आहे.

घटनेचा पंचनामा करताना पोलीस

By

Published : Apr 24, 2019, 10:15 PM IST

वाशिम - कारंजा-मुर्तीजापूर मार्गावरील ग्राम खेर्डा नजीक कंटेनर अल्टो कारची समोरसमोर धडक झाली. यात अल्टो कारमधील विशाल विनोद शर्मा आणि पियुष गजानन घोगरे (दोघे रा. नवदुर्गा विहार, अमरावती) हे जागीच ठार झाले.

घटनेचा पंचनामा करताना पोलीस

कंटेनर (एम. एच. १२ क्यू. जी. ८४०५) मुर्तीजापूरवरून कारंजाकडे जात असताना आणि अल्टो कार (एम.एच. २७.सी. ४७३५) कारंजाकडून मुर्तीजापूरकडे येत असताना दोघांची समोरासमोर धडक झाली. यात २ जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच कारंजा शहरातील सर्वधर्म आपात्कालीन पथक तसेच कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताचा तपशील घेत मदतकार्य केले.

ABOUT THE AUTHOR

...view details