महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Atrocity Against Nawab Malik : नवाब मलिक यांना 13 डिसेंबरला हजर राहण्याचे वाशिम न्यायालयाचे आदेश

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र नोकरी मिळविल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांची नोकरी जाणार असल्याचेही वक्तव्य अल्पसंख्याक मंत्र्यांनी केले होते. प्रत्यक्षात समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईंकाजवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याचा संजय वानखडे यांचा दावा आहे. संजय वानखेडे हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ आहेत.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Dec 4, 2021, 5:49 PM IST

वाशिम- एनसीबीचे अधिकारी प्रमुख समीर वानखडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद हा ( Sameer Wankhede Vs Nawab Malik case ) कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. समीर वानखेडे यांचे चुलतभाऊ यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रासिटी कायद्यानुसार वाशिम पोलिसात ( Complaint of atrocity against Nawab Malik in Washim ) तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात 13 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने मलिक यांना दिले आहेत.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र नोकरी मिळविल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांची नोकरी जाणार असल्याचेही वक्तव्य अल्पसंख्याक मंत्र्यांनी केले होते. प्रत्यक्षात समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईंकाजवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याचा संजय वानखडे यांचा दावा आहे. संजय वानखेडे हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी वाशिम शहर पोलिसांत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार केली आहे.

हेही वाचा-समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा हळुहळू पुढे येऊ लागला, नवाब मलिकांचा पुन्हा एनसीबी अधिकाऱ्यावर निशाणा


याचिकाकर्ते संजय वानखडे यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ, अॅड . उदय देशमुख ( Advocate Uday Deshmukh on Complaint of atrocity ) यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तीवाद केला. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशिम न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नवाब मलिक त्यांची बाजू मांडण्यासाठी वाशिम न्यायालयात येणार असल्यामुळे वाशीम जिल्ह्यातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे .

ज्येष्ठ विधीज्ञ, अॅड . उदय देशमुख माहिती देताना

हेही वाचा-समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चौकशी सुरू

समीर वानखेडे यांच्या प्रमाणपत्राची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चौकशी सुरू

एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात ( controversy of Sameer Wankhedes cast certificate ) राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची चौकशी सुरू झाली आहे. अशोक कांबळे या सामजिक कार्यकर्त्यांनी एनसीपीच्या अधिकारी समीर वानखेडे यांचा जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली आहे व त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातमी वाचा-नवाब मलिक यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचा आरोप


जात प्रमाणपत्रावरून काय सुरू आहे वाद?

कॉर्डलिया क्रूझवरील ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले होते. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला. तसेच कारवाईचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले होते. मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेटही त्यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. वानखेडे कुटुंब आणि मलिक यांच्यात यावरून जुंपली आहे. नवाब मलिक यांनी समीरच्या जात प्रमाणपत्रात छेडछाड केल्याचा गंभीर आरोप समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही केला होता. क्रांती रेडकर यांनी मलिक यांनी प्रतिउत्तर दिले. त्या म्हणाल्या होत्या की, समीर हिंदू आहेत. माझ्या सासूबाईच्या आनंदासाठी त्यांनी निकाह केला होता. त्या कागदपत्रांचा माझ्या सासऱ्यांशी व समीर वानखेडेंशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details