वाशिम - आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. त्यासाठीच वाशिममधील राजस्थान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या ११०० गणेश मूर्ती साकारल्या आहे. तसेच त्या सर्व मूर्तींची स्थापना देखील करण्यात येणार आहे. महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती सप्ताह अंतर्गत गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी या मूर्ती साकारल्या.
वाशिममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या ११०० गणेशमूर्ती - वाशिममधील राजस्थान महाविद्यालय
वाशिममधील राजस्थान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या ११०० गणेशमूर्ती साकारल्या आहे. त्यामधून त्यांनी पर्यावरणाला वाचवण्याचा संदेश दिला आहे. तसेच त्या मूर्तींची स्थापना करण्याचा संकल्प सुद्धा केला आहे.
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तीने पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. त्यासाठी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यात येत आहे. तसेच यासाठी बनवलेली शाडू मातीची मूर्ती पाण्यात देखील अगदी सहज विरघळते. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यासाठी मदत होते.
शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीनंतर पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रोपटे भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्या रोपट्यांची लागवड करण्याचा संकल्पही देखील केला आहे. मातीपासून दुरावत चाललेल्या तरुणाईचे मातीशी बंध जोपासणारे पर्यावरणीय संस्कार आजच्या रासायनिक युगात खरच कौतुकास्पद ठरतात.