महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी पथके तैनात ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली

By

Published : Sep 22, 2019, 6:22 AM IST

वाशिम - केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली

जिल्ह्यात एकूण 4 लाख 55 हजार 380 महिला मतदार तसेच 4 लाख 98 हजार 352 पुरुष मतदार तसेच इतर 10 मतदार आहेत. अद्याप मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींना 25 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 18 ते 19 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

निवडणूक कालावधील जिल्ह्यात 11 फिरती पथके तसेच 14 स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आल्याचे मोडक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details