यवतमाळ- लोकसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा यवतमाळ - वाशिम मतदार संघातून विजयी झालेल्या भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.
जल्लोष; खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान - निवडणूक
यवतमाळ - वाशिम मतदार संघातून विजयी झालेल्या भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले.
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदामात सुरूवात झाली. एकूण 30 फेऱ्यांमधील ही मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाणे यांनी भावना गवळी यांना विजयी घोषित केले. भावना गवळी यांना एकूण 5 लक्ष 42 हजार 98 मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर माणिकराव ठाकरे यांना 4 लक्ष 24 हजार 159, प्रविण पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची 94 हजार 228 मते पडली.
या मतदार संघात एकूण वैध मते 11 लक्ष 74 हजार 220 तर अवैध मते 604 असे एकूण 11 लक्ष 74 हजार 824 मतांची मतमोजणी करण्यात आली. यात पोस्टल बॅलेट पेपरच्या 4847 मतपत्रिकांचा समावेश आहे.