वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित असलेला रुग्ण ओळखला जावा, त्याला कोरोनासारखी लक्षणे असल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला मिळावी, याकरिता मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरच्या चिट्ठीशिवाय सर्दी, ताप, खोकला व अंगदुखीसारख्या आजारांचे औषध मिळणार नसल्याचे फलक वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या एका मेडिकल चालकाने लावून कोरोनाबद्दल सतर्कता ठेऊन सेवा देत आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्दी, खोकला, तापाचे औषधे मिळणार नाहीत, मेडिकलकडून खबरदारी
कोरोना रुग्णाची ओळख पटविण्यासाठी मालेगाव येथील धनश्री मेडिकल चालक संतोष शेट्टी यांनी आपल्या मेडिकलमध्ये कोरोना लक्षणे ओळखण्यासाठी व याची माहिती आरोग्य विभागाला देण्यासाठी डॉक्टरांची चिट्ठी बंधनकारक केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक दवाखाने बंद आहेत. त्यामुळे औषधाची गरज असणारे लोक औषधविक्रेत्यांकडून औषधे घेत आहेत. काही डॉक्टर रुग्णांना फोनवर औषधांची माहिती देत आहेत. कोरोना रुग्णाची ओळख पटविण्यासाठी मालेगाव येथील धनश्री मेडिकल चालक संतोष शेट्टी यांनी आपल्या मेडिकलमध्ये कोरोना लक्षणे ओळखण्यासाठी व याची माहिती आरोग्य विभागाला देण्यासाठी डॉक्टरांची चिट्ठी बंधनकारक केली आहे. यासोबतच औषध नेणाऱ्या व्यक्तीचा पत्ता, मोबाईल नंबरसह नोंद व पैसेसुद्धा सॅनिटायजर करून घेण्यात येत आहेत.
मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय सर्दी, ताप, खोकला व अंगदुखीसारख्या आजारांची औषधी देऊ नका, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने औषधविक्रेत्यांना दिले आहेत. त्याचे तंतोतंत पालन मालेगाव येथील दुकानदार करत असल्याचे दिसून आले.