वाशिम - रिसोड शहरात स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. समता फाउंडेशन व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता रॅली काढण्यात आली होती.
रिसोडमध्ये भजनाच्या माध्यमातून वारकऱ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश - washim rally
जिल्ह्यातील रिसोड शहरात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. समता फाउंडेशन व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता रॅली काढण्यात आल होती.
हेही वाचा - 'सीएसएमटी'ला देशातली सर्वाधिक स्वच्छ स्थानकाचा मान
जिल्ह्यातील रिसोड शहरात 'स्वच्छता हीच सेवा' हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषद येथून नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी राजस्थान प्रथमिक व माध्यमिक शाळा, ज्ञानदिप प्राथमिक शाळा, सनराईज स्कूल तसेच नगर पालिकेच्या शाळेने सहभाग नोंदवला. तसेच या रॅलीमध्ये वारकरी दिंडीचाही सहभाग होता. यावेळी वारकऱ्यांनी भजनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांनीही स्वच्छतेविषयी घोषणा दिल्या.