महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट - विधानसभा निवडणूक न्यूज 2019

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कारंजा येथे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाशिममध्ये महायुतीचे उमेदवार लखन मलिक यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. दरम्यान, गृहमंत्री शाह हे पोहरादेवीत येऊनही वेळेअभावी रामराव महाराजांशी भेटले नाहीत. त्यामुळे बंजारा समाजाने नाराजी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

By

Published : Oct 17, 2019, 9:47 AM IST

वाशिम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाऊन संत रामराव महाराजांची भेट घेतली. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारंजा येथील सभेपूर्वी पोहरादेवीला गेल्यानंतरही रामराव महाराजांची भेट न घेतल्याने बंजारा समाजात नाराजी पसरली होती. ती नाराजी दुर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी महाराजांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली रामराव महाराजांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कारंजा येथे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाशिममध्ये महायुतीचे उमेदवार लखन मलिक यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. दरम्यान, गृहमंत्री शाह हे पोहरादेवीत येऊनही वेळेअभावी रामराव महाराजांशी भेटले नाहीत. त्यामुळे बंजारा समाजात नाराजी व्यक्त होती.

हेही वाचा -२१ वर्ष उलटूनही 'या' गावाला नाही ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पोहरादेवी भेटी दरम्यान बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांची वेळेअभावी राहिलेल्या भेटीची निवडणुकीच्या तोंडावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यांच्या चिंतेत वाढ झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामराव महाराजांची भेट घेतली.

हेही वाचा - 'दोन्ही पैलवान तोलामोलाचे असल्याशिवाय कुस्तीत मजा येत नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details