वाशिममधील अंध बांधवांची डोळस कामगिरी... कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी राखी विक्री करून केली मदत - कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त
केकतउमरा येथील चेतन उचितकर हा जन्मता अंध आहे. चेतनच्या वडिलांनी अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील अंध मुलांना एकत्र करून 'चेतन अंकुर' ही संस्था उभी केली आहे. या अंध मुलांनी राख्या बनवून कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना मदत केली आहे.
वाशिममधील अंध बांधवांची डोळस कामगिरी
वाशिम - सध्या माणसा-माणसांतील जिव्हाळा संपत चालल्याचे चित्र आहे. मात्र राज्यातील जलप्रलयामुळे उघड्यावर आलेल्या कुटूंबांना राखी विक्रीतून आलेली रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय, वाशिम जिल्ह्यातील काही अंध व्यक्तींनी घेतला आहे. केकतउमरा येथील अंध बांधवांनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कामगिरी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.