वाशिम- चला हवा येऊ द्या या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकुर वाढवे याने आज निकिता खडसेसोबत वाशिममध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला. एकीकडे धनदांडगे लग्न समारंभावर कोट्यवधीचा खर्च करीत असताना अंकुरने साध्या पद्धतीने विवाह करून सामाजिक संदेश दिला आहे.
चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे अडकला विवाहबंधनात, दिला सामाजिक संदेश - सामाजिक संदेश
वाशिम जिल्ह्यातील सुकळी येथील निकिता खडसेसोबत 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेने विवाह केला असून हा विवाह नोंदणी पध्दतीने झाला. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
वाशिम जिल्ह्यातील सुकळी येथील निकिता खडसेसोबत चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवेने विवाह केला असून हा विवाह नोंदणी पध्दतीने झाला. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. टीव्ही शोमध्ये अनेकवेळा लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अंकुरला आज खऱ्याखुऱ्या लग्नासंबंधी विचारले असता त्यानी गमतीशीर उत्तर दिलं.
यासोबतच राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी वर्ग अडचणीत आहे. त्यामुळं मी साध्या नोंदणी पद्धतीने विवाह केला असून इतरांनीही लग्नावर पैसे खर्च न करता माझ्यासारखे साधे लग्न करावे, असं आवाहन अंकुरनं चाहत्यांना केलं आहे.