वाशिम- शेतकऱ्यांना रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे द्वारका उत्सव साजरा करण्यात येतो. शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलासोबत आपल्या शेतात अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यालाही आपल्या कामातून वेळ मिळावा म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
वाशिममध्ये पोळ्याच्या दुसर्या दिवशी साजरा केला जातो द्वारका उत्सव - वाशिममधील द्वारकोत्सव
बेैलांना आपल्या कामातून विरंगुळा मिळण्यासाठी ज्याप्रमाणे बैलपोळा साजरा केला जातो त्याप्रमाणे त्या बैलाबरोबर अहोरात्र कष्ट करणाऱ्या मालकाच्या विरंगुळ्यासाठीही द्वारकाेत्सवासारखा सण साजरा केला जातो. या उत्सवातून विविध सामाजिक संदेश देण्यात येतात.
वाशिममधील द्वारकोत्सव
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वच जातीधर्माचे शेतकरी या शोभायात्रेत आनंदाने सहभागी होतात. सामाजिक बंधुभाव तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश या उत्सवाच्या माध्यमातून देण्यात येतो. गेल्या 150 वर्षांपासून हा उत्सव साजरा होत असून सर्वच जातीधर्माचे शेतकरी आपल्या बैलांसह यात सहभागी होतात.
हेही वाचा- वाशिम जिल्ह्यात गोठ्याला विजेचा शॉक लागून ८ जनावरांचा मृत्यू
Last Updated : Aug 31, 2019, 4:59 PM IST