वाशिम - जिल्ह्यातील मेडशी येथील अकोला - नांदेड मार्गावर असलेले सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याची घटना घडली. यावेळी सुरक्षारक्षकावर देशी कट्टा रोखत शांत बसण्यास सांगितले.
एटीएम फोडण्यासाठी सुरक्षारक्षकावर रोखला देशी कट्टा; घटना सीसीटीव्हीत कैद - atm robbery cctv
जिल्ह्यातील मेडशी येथील अकोला - नांदेड मार्गावर असलेले सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याची घटना घडली.
दरम्यान, या एटीएमचे शटर सुरक्षारक्षकाने आतून बंद केले होते. मध्यरात्री दोन वाजेदरम्यान तीनजण तिथे आले. आम्हाला पैसे काढायचे आहेत म्हणून एटीएमचे शटर उघडायला लावताच त्यातील एकाने सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर देशी कट्टा रोखला व इतर दोघांनी गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एटीएमचा अलार्म वाजल्याने या चोरट्यांनी कारमधून अकोल्याच्या दिशेने पळ काढला.
एटीएम गॅस कटरने कापण्यात यश न आल्याने त्यातील रक्कम सुरक्षित आहे. यानंतर मालेगाव पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केली आहे.