महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगरुळपीर पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केली 4 लाखाची रोकड जप्त - washim news

निवडणुकीच्या तोंडावर मंगरुळपिरात पोलिसांना एका गाडीत 3 लाख 90 हजार रुपायांची रोकड हाती लागली आहे.

मंगरुळपीर पोलिसांची कारवाई

By

Published : Sep 28, 2019, 2:17 AM IST

वाशिम - मंगरुळपीर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी फेट्रा फाटा येथील चेक पोस्ट वर ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जप्त करण्यात आलेली रोकड
मंगरुळपीर तालुक्यातील फेट्रा फाट्यावर शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता चेक पोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एका चारचाकी वाहनाची (वाहन क्रमांक एम एच २७ बी ई १७८८) तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये ३ लाख ९० हजार रुपये रोख आढळली आहे. दरम्यान वाहन चालक शहा यांना यासंदर्भात विचारले असता, ही रक्कम मजुरांच्या मजुरीची असल्याची माहिती वाहन चालक शहा यांनी पोलिसांनी दिली आहे. यानंतर वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details