वाशिम - मालेगाव शहरातील अर्चना मिश्रा यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह 10 हजार रोख रक्कम असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चार दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. या घटनेची मालेगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यानंतर मिश्रा यांचा मोठा मुलगा आयपीएल सामन्यात पैसे हरल्यामुळे त्यानेच हा चोरीचा डाव रचल्याचे उघडकीस आले आहे.
आयपीएलच्या सट्ट्यात पैसे हरल्याने स्वत:च्या घरातच चोरी! - theft in wahsim
मालेगाव शहरातील अर्चना मिश्रा यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह 10 हजार रोख रक्कम असे एकूण तीन लाख रुपयांच ऐवज चार दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. या घटनेची मालेगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यानंतर मिश्रा यांचा मोठा मुलगा आयपीएल सामन्यात पैसे हरल्यामुळे त्यानेच हा चोरीचा डाव रचल्याचे उघडकीस आले आहे.
आयपीएलच्या स्ट्ट्यात पैसे हरल्याने स्वत:च्या घरातच चोरी!
दरम्यान घरफोडी करणाऱ्या तेजस मिश्रा आणि मित्र अमित सारस्कर दोघांना एक लाख 57 हजारांच्या मुद्देमालासह मालेगाव पोलिसांनी अटक केली असून काही दागिने सुवर्णकारांना विकल्याचे त्यांनी सांगितले. हे दागिने ताब्यात घेणार असल्याचे ठाणेदार आधारसिंग सोनुने यांनी सांगितले.
दरम्यान, यंदा आयपीएल सामने टीव्ही तसेच डिजीटल माध्यमांवर सर्वाधिक पाहिले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी बसून फोनमार्फत तसेच ऑनलाइन बेटींग करण्याचे प्रमाण वाढले आहे.
Last Updated : Oct 29, 2020, 5:17 AM IST