वाशिम - जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून ब्रॉडबॅण्ड सेवेची लिंक फेल असल्यामुळे कुठलाही व्यवहार होत नाही. त्यामुळे बँकेच्या इतर ग्राहकांसह शेतकरी, व्यापारी हे अडचणीत आले आहेत. बँकेने त्वरित व्यवहार सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 15 दिवसांपासून ब्रॉडबॅण्ड सेवेची लिंक फेल - washim nationalized banks
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून ब्रॉडबॅण्ड सेवेची लिंक फेल असल्यामुळे कुठलाही व्यवहार होत नाही. त्यामुळे बँकेच्या इतर ग्राहकांसह शेतकरी, व्यापारी हे अडचणीत आले आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे .अशा परिस्थितीत जिल्ह्यातील बँका या सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू आहेत. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी बँकेसमोर ग्राहकांची भलीमोठी रांग लागते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून या बँकेमध्ये लिंक फेल होत असल्यामुळे ग्राहकांचे कुठलेही व्यवहार होत नाहीत. अनेक लोकांच्या जनधन खात्यात सरकारने 500 रुपये जमा केले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत मदतीचा हात शासनाकडून मिळाल्यामुळे सदर रक्कम काढण्यासाठी बँकासमोर मोठी गर्दी होत आहे.