महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये वाण निघाले बोगस, भेंडी पीक काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ - संतोष साळुंके

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेंडीच्या बोगस बियाणांचा फटका बसला आहे. तीन महिने उलटूनही भेंडी न लागल्याने शेतकऱयांची तीन महिन्याची मेहनत वाया गेली आहे. शासनाने या संदर्भात लक्ष घालावे आणी बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रावर व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेंडीच्या बोगस बियाणांचा फटका

By

Published : Jul 8, 2019, 5:47 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेंडीच्या बोगस बियाणांचा फटका बसल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच प्रकार हिरंगी येथील शेतकरी संतोष साळुंकेसोबत झाला आहे. संतोष याने 'भूमी 99' या भेंडिच्या वाणाची 3 एकरावर लागवड केली. त्यांचे पाहून परिसरातील इतरही काही शेतकऱ्यांनी याच वाणांची लागवड केली होती. पंरतु हे वाण भोगस निघाल्याने याचा आर्थिक फटका या शेतकऱ्यांना बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेंडीच्या बोगस बियाणांचा फटका,25 एकरतील भेंडी उपटण्याची वेळ

हिरंगी येथील शेतकरी संतोष साळुंके यांनी उन्हाळी भेंडी पिकासाठी 'भूमी 99' या कंपनीचे बियाणाची लागवड केली होती. त्यांच्या सोबतच परिसरातील इतरही काही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी 25 एकरावर याच वाणांची लागवड केली होती. परंतु तीन महिने उलटूनही रोपाला भेंडी न लागल्याने, या सर्वांनाच शेतातील उभे पिक काढून टाकण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांनी संबंधीत कंपनीकडे तक्रार करूनही कंपनीने दखल न घेतल्याने आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. लागवडीचा खर्च देखील न मिळाल्याने शेतकरी हैराण आहे. त्यामुळे या बाबतीत सरकारने आणी कृषी विभागाने लक्ष घालुन या कंपनीवर व बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रावर कारवाई करावी. तसेच संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details