महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेत्रहीन चेतनचे नेत्रदीपक उपक्रम, 'लोडशेडिंग' असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाटले सौर कंदील - वाशिम दिवाळी बातमी

नेत्रहीन असलेल्या चेतनने लोडशेडींगमुळे अभ्यासात अडथळा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सौर कंदील दिवाळी भेट म्हणून दिली आहे. हे कंदील त्याने आपल्या खाऊच्या पैशातून खरेदी केले आहे. चेतनच्या या नेत्रदिपक उपक्रमामुळे त्याचा सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

सौर कंदील वाटप करताना
सौर कंदील वाटप करताना

By

Published : Nov 16, 2020, 9:27 PM IST

वाशिम - स्वतःचे आयुष्य कायमचे अंधारात असणाऱ्या नेत्रहीन चेतनने लोडशेडिंग असलेल्या ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी खाऊच्या पैशातून वाशीम जिल्ह्यातील माळेगाव येथील 15 गरजूंना सौर कंदिलाचे वाटप केले आहे. या कोरोनाच्या काळात हा राबविलेला उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा येथील जन्मांध असलेला 10 वर्षीय चेतन उचितकर यास जीवनातील अंधार माहित आहे. त्यामुळे गरीब मुलांना अभ्यास करण्यासाठी वीज उपलब्ध राहत नसल्याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातून दिवाळी साजरी न करता दिवाळीच्या दिवशी सौर कंदील वाटप केले आहेत. नेत्रहीन असलेल्या चेतनच्या नेत्रदीपक उपक्रमामुळे त्याचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details