महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टारगेट दिले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गृहमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने भाजपा आक्रमक झाले असून, भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. वाशिममध्ये देखील भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

वाशिमध्ये भाजपाचे आंदोलन
वाशिमध्ये भाजपाचे आंदोलन

By

Published : Mar 21, 2021, 5:21 PM IST

वाशिम -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टारगेट दिले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गृहमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने भाजपा आक्रमक झाले असून, भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. वाशिममध्ये देखील भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजपाच्या वतीने पाटणी चौकात निदर्शने करत, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वाशिमध्ये भाजपाचे आंदोलन

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी आढळून आली होती. याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच गाडी मालक हिरेन यांचा मृत्यू झाला, हे प्रकरण राज्यात सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाले असून, भाजपाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. आज वाशिममध्ये देखील आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार लखन मलिक, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, जिल्हा महामंत्री नागेश घोपे हे सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा -मनसुख हिरेन हत्येप्रकरणी दोघांना अटक; एका बडतर्फ पोलिसाचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details