वाशिम - भाजपकडून वाशिममध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिकीट वाटपासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात ३ मतदारसंघातून तब्बल ४५ जणांनी मुलाखत दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार अमर साबळे कारंजा-मानोरा विधानसभेसाठी सर्वात कमी तर अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचा त्यामध्ये सर्वाधिक २७ भरणा असल्याचे दिसून आले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळविण्याकरिता इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यानुषंगाने वाशिममध्ये पक्षनिरीक्षक तथा खासदार अमर साबळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये कारंजा आणि वाशिम या दोन मतदारसंघातील विद्यमान आमदारांसह तब्बल ४५ जणांनी मुलाखती दिल्या.
यात कारंजातून सर्वात कमी ५ इच्छुकांनी मुलाखत दिली. वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी २७ जणांनी तर रिसोड विधानसभा मतदारसंघातून १३ जणांनी मुलाखत दिली.