वाशिम - राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांना दवाखान्यात व्यवस्थित उपचार मिळत नसून, जेवणही चांगले मिळत नाही. त्यामुळे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपच्या वतीने वाशिम येथे आज आंदोलन करण्यात आले.
सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन... - washim bjp agitation
राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपच्या वतीने वाशिम येथे आज आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र बचाव आंदोलन
भाजपचे जिल्हाध्यक्ष, कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात सर्वांनी काळे टीशर्ट व मास्क लावून हे आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात मेरा आंगण मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव, अशा घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. अशाप्रकारे सर्व राज्यभरात आज भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती राज्य सरकार योग्यप्रकारे हाताळत नसल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे.