वाशिम- खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागताच वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अकोल्यासह वाशिममध्येदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
संजय धोत्रे यांची मंत्रीपदी वर्णी; भाजप कार्यकर्त्यांचा मालेगावात जल्लोष - संजय धोत्र
गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अकोल्यासह वाशिममध्येदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार लगावणाऱया खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागताच रिसोड मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुरुवारी रात्री दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वाशिम अकोला रोडवरील जुन्या बस स्थानकावर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत पेढे, मिठाई वाटून आनंद साजरा केला.