वाशिम - बारामतीत निवडणूक प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्षणा सलगर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युतीच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे आज वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी सलगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले.
वाशिममध्ये सक्षणा सलगरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत भाजपचे आंदोलन - सक्षणा सलगर
बारामतीत सक्षणा सलगर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युतीच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे आज वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी सलगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन केले.
भाजप कार्यकर्त्यांचे जोडो मारो आंदोलन
सलगर यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना मोदींवर आणि युतीबाबत अपशब्द वापरत टीका केली होती. ते भाषण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या भाषणामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी यासंदर्भातील निवेदन देऊन सलगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनावेळी रिसोड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून प्रतीकात्मक पुतळा ताब्यात घेतला आहे.