वाशिम-वीजबिल भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना वीजबिल भरण्याचा संदेश देण्यात आला.
वीजबिलाच्या जनजागृतीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांची सायकल रॅली - महावितरणकडून वीजबिल भरण्याचे आवाहन वाशिम
वीजबिल भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना वीजबिल भरण्याचा संदेश देण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी केले वीजबिल भरण्याचे आवाहन
महावितरण ग्राहकांना अखंडित वीजसेवा देत आहे, मात्र राज्य सरकारने वीजबिल वसुलीचे आदेश दिले आहेत. जे वीजबिल भरणार नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन देखील कट होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी वेळेत आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे. आणि सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी विद्युत कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. या सायकल रॅलीला वीज वितरण कार्यालयापासून सुरुवात झाली. बस स्टॅंड परिसर, आंबेडकर चौक, पाटणी चौकासह शहरातील विविध भागात यावेळी कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली.