वाशिम : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बियर बार, दारू दुकानांमध्ये आता एकूण बैठक क्षमतेच्या २५ टक्के ग्राहकांनाच बसण्याची मुभा राहील. या नियमाचे उल्लंघन केल्यास बियर बार, दारू दुकाने बंद करण्यात येतील. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज (१५ मार्च) दिले.
वाशिममधील बियर बार, दारू दुकाने २५ टक्के बैठक क्षमतेने सुरू राहणार - वाशिम बिअर बार निर्बंध
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता वाशिममधील सर्व बियर बार, दारू दुकानांमध्ये आता एकूण बैठक क्षमतेच्या २५ टक्के ग्राहकांनाच बसण्याची मुभा राहील.
बियर बार, दारू दुकाने २५ टक्के बैठक क्षमतेने सुरू राहणार
नियमांचा भंग केल्यास होणार गुन्हा दाखल..
या आदेशाचा भंग केल्यास, तो भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध मानण्यात येईल. तसेच, अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असे या आदेशात म्हटले आहे.