बीड - बीड येथून नागपूरकडे जात असलेल्या भरधाव सागर ट्रॅव्हल्सला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली. औरंगाबाद नागपूर महामार्गावरील कीन्हीराजा हॉटेलजवळ ही घटना घडली असून यामध्ये गाडी जागीच जळून खाक झाली आहे. बसमधील प्रवाशांना चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, प्रवाशांचे सामान आणि पैसे जळाल्याची माहिती आहे.
बीडहून नागपूरला जाणारी ट्रॅव्हल्स जळून खाक, प्रवाशांच्या सामानाची झाली राख
बीड येथील सागर ट्रॅव्हल्स रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास नागपूरकडे जाण्यास निघाली. गाडी भरधाव वेगात असताना अमरावतीजवळ मालेगाव रस्त्यावर गाडीने अचानक पेट घेतला.
बीड येथील सागर ट्रॅव्हल्स रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास नागपूरकडे जाण्यास निघाली. गाडी भरधाव वेगात असताना औरंगाबाद नागपूर महामार्गावरील कीन्हीराजा हॉटेलजवळ गाडीने अचानक पेट घेतला. गाडीला समोरून लाग लागली होती. त्यामुळे चालक आणि काही प्रवाशांच्या वेळीच लक्षात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना तातडीने आपातकालीन दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले. गाडीचा अक्षरशः कोळसा झाला असून बीडसह अन्य सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे. मात्र, प्रवाशांचे गाडीमध्ये ठेवलेले साहित्य तसेच बॅगमध्ये ठेवलेले पैसे आगीत जळून खाक झाले आहे.