महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरपूर ते करंजी रस्त्याची दुरावस्था; चिखलमय रस्त्यातून काढावी लागतेय वाट - washim public Works Department

जिल्ह्यातील शिरपूर - वाशिम या रस्त्याने शिरपूर, शेलगाव खवणे, वाघी, कोठा, खंडाळा, मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा, चांडस, दुधाळा, वसारी, तिवळीसह परिसरातील २५ ते ३० गावातील हजारो नागरिक दररोज विविध कामासाठी वाशीम इथं ये-जा करत असतात.

because of muddy road people in washim people are facing problem
शिरपूर ते करंजी रस्त्याची दुरवस्था; चिखलमय रस्त्यातुन काढावी लागत आहे वाट

By

Published : Jul 4, 2020, 4:46 PM IST

वाशिम -जिल्ह्यातील शिरपूर ते करंजी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने अनेक वाहन चिखलात फसत असून नागरिकांसह वाहनचालकांचे हाल होत आहे.

जिल्ह्यातील शिरपूर- वाशिम या रस्त्याने शिरपूर, शेलगाव खवणे, वाघी, कोठा, खंडाळा, मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा, चांडस, दुधाळा, वसारी, तिवळीसह परिसरातील २५ ते ३० गावातील हजारो नागरिक दररोज विविध कामासाठी वाशीम इथे ये-जा करता.शिरपूर ते वाशिम मार्ग जिल्हा मुख्यालयाला जोडणारा मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांची या मार्गावर वर्दळ असते. मात्र, या मार्गावरील शिरपूर ते करंजी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. आता पावसाळा असल्यामुळे रस्त्यांवरील खड्यांमध्ये पाणी साचते. तसेच पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाल्याने अनेक वाहन येथे चिखलात फसत असून नागरिकांसह वाहनचालकांचे हाल होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार केल्या व रस्ता दुरुस्ती करण्याची विनंती केली. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

हेही वाचा -'वा रे वा..! मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, अन् कोरोनाच्या पॅकेजसाठी नाहीत'

ABOUT THE AUTHOR

...view details