महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बँक व्यवस्थापकास मारहाण; घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद - vidharbha kokan gramin bank washim

अनसिंग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून गणेश कापसे यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. हे कर्ज मागील काही दिवसांपासून एनपीए झाले आहे. शाखा व्यवस्थापक संजय तळेगावकर हे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यासोबत गणेश कापसे यांच्या घरी वसुली करीता गेले होते.

bank manager beaten by youngster in buldana case filed
बँक व्यवस्थापकास मारहाण; घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद

By

Published : Feb 7, 2020, 8:25 AM IST

वाशिम - थकीत कर्ज वसुलीकरीता घरी आल्याचा राग मनात ठेवून बँकेच्या कार्यालयात जाऊन बँक व्यवस्थापकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना अनसिंग येथे घडली. मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बँक व्यवस्थापकास मारहाण; घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद

अनसिंग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून गणेश कापसे यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. हे कर्ज मागील काही दिवसांपासून एनपीए झाले आहे. शाखा व्यवस्थापक संजय तळेगावकर हे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यासोबत गणेश कापसे यांच्या घरी वसुलीकरीता गेले होते. तर आमच्या घरी वसुलीकरीता का आले? या गोष्टीचा राग मनात ठेवून गणेश कापसेचा भाऊ अंकुश कापसे याने आपल्या साथीदारांसह बँकेच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापक संजय तलेगावकर यांना मारहाण केली.

हेही वाचा -संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण

ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details