वाशिम - संपूर्ण राज्यात होळीचा सण साजरा होत आहे. वाशिममधील बंजारा पाड्यावरील बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून डफलीच्या तालावर बंजारा लोकनृत्य करीत धुळवड साजरी केली. वृद्ध महिलांनीही मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बंजारा समाजात तब्बल एक महिना होळीचा सण साजरा केला जातो. यामध्ये होळीचा दुसरा दिवस महत्त्वाचा असून या वर्षी रंग खेळले जातात. या समाजासाठी दरवर्षी हाच रंगपंचमीचा दिवस असतो. यंदाही मोठ्या उत्साहात जिल्ह्यातील गावोगावी संस्कृतीप्रमाणे रंगपंचमी साजरी करण्यात आली.