वाशिम : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळं सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाल आहे. मात्र, वाशिम शहरातील ध्रुव चौकात राहणाऱ्या राधा गोटे यांनी 10 महिलांचा प्रेरणा महिला बचत गट तयार करून गृहउद्योग सुरू केला आहे. या गटामार्फत किचनमध्ये लागणारे सर्वच पदार्थ तयार करून त्यांची विक्री करीत आहेत. त्यामुळं वर्षाकाठी खर्चवजा पाच ते सहा लाख रुपये निव्वळ नफा होत आहे. गटातील प्रत्येक महिलांना महिन्याकाठी पाच हजार रुपये घरबसल्या मिळत आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त ( Woman's Day Special 2022 ) पाहूया या बचत गटांची यशोगाथा.....
वाशिम शहरातील ध्रुव चौक येथे राहत असलेल्या या आहेत राधा गोटे यांनी दहा महिला एकत्र करून 2011 मध्ये प्रेरणा महिला बचत गट स्थापन केला. त्यानंतर दर महा शंभर रुपये बँकेत राशी जमा करणे सुरु केले. बँकेत बचत झाल्यानंतर त्यांनी गृह उद्योग करण्याचे ठरविले.
हेही वाचा -VIDEO : सावित्रीच्या लेकींच्या हाती सावित्री पथकाची जवाबदारी
गृहउद्योगातून महिलांना मिळाला रोजगार
देशासह राज्यात आलेल्या कोरोना महामारी मुळे अनेक व्यवसाय डबघाईस आले. या गोष्टीचा विचार करून बचत गटाच्या अध्यक्षा राधा गोटे यांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून घरगुती किचन मध्ये लागणारे सर्व पदार्थ घरी तयार केले. पापड, कुरड्या, शेवाळ्या, मुंग वड्या, नागेली पापड, तसेच विविध प्रकारचे पदार्थ तयार करून विक्री करण्याची सुरुवात केली. त्या माध्यमातून बचत गटाच्या सर्व महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला. आणि आता महिला दरमहा पाच ते सहा हजार रुपये महिना कमावत आहे.
बचत गट केला स्थापन
स्थानिक ध्रुव चौकातील 10 महिलांनी एकत्र येऊन प्रेरणा बचत गट स्थापन केला. गटांतील महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. सध्या स्वतः बनवीत असलेले पदार्थ येत्या काळात मशीनने खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. चूल आणि मूल एवढेच आपले विश्व समजणाऱ्या महिलांसाठी राधा गोटे यांनी बचत गटाच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटात सर्व हादरले. मात्र राधा गोटे आणि त्यांच्या बचत गट इतर महिलांनाही प्रेरणा देतो. याच राधा गोटे व त्यांच्या बचत गटातील महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त ई टीव्ही भारतचा सलाम..
हेही वाचा -Womens day 2022: 40 हून अधिक अनोखे कार्ड बनवून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली