वाशिम- नवसाचा देव अशी ओळख असलेल्या अवलिया महाराज यांच्या १३१ व्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आज वाशिम जिल्ह्यातील काळामाथा येथे भव्य महाप्रसाद वाटप सकाळपासून सुरू झाला आहे. अवलिया महाराज यांच्या दर्शनासाठी महाप्रसाद घेत गाडा ओढून अवलिया महाराज यांचा नवस फेडण्यासाठी लाखो भाविक भक्त या यात्रेत दाखल झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यात नवस फेडण्यासाठी शेंडीने गाडा ओढण्याची परंपरा - Devotee
बरेच नवीन भाविक अवलिया महाराज यांच्या समाधीस्थळी येऊन आपला संकल्पपूर्तीचा नवस कबूल करतात. ही संकल्पपूर्ती झाली, की पुढच्या वर्षी येणाऱ्या यात्रेच्या दिवशी काळामाथा येथे येऊन आपला नवस फेडतात.
काळामाथा येथील अवलिया महाराज हे जागृत देवस्थान असून ही यात्रा नवसासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी भाविक या ठिकाणी येतात. त्यात बरेच नवीन भाविक अवलिया महाराज यांच्या समाधीस्थळी येऊन आपला संकल्पपूर्तीचा नवस कबूल करतात. ही संकल्पपूर्ती झाली, की पुढच्या वर्षी येणाऱ्या यात्रेच्या दिवशी काळामाथा येथे येऊन आपला नवस फेडतात.
नवस फेडणाऱ्यांची व नवस कबूल करणाऱ्या भाविक भक्तांची संख्याही दरवर्षी वाढतच आहे. काही भाविक पायी, तर काही भाविक गाडा ओढून नवस फेडतात. काही भाविक पुरणपोळीचा नैवेद्य अवलिया चरणी अर्पण करतात. यावर्षी ही यात्रा औरंगाबाद-नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूने भरली असून आपली नवस करण्यासाठी लाखो भाविक काळामाथा येथे दाखल झाले आहेत.