महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकरी आंदोलनास पाठिंबा, मात्र जिओचा टॉवर जाळण्याच्या व्हिडिओविषयी माहिती नाही' - Washim agitation news today

वाशिम तालुक्यातील तोंडगाव परिसरात जिओचा टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वाभिमानीच्या विजयाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांना याविषयी माहिती नाही.

Washim
Washim

By

Published : Dec 13, 2020, 12:04 PM IST

Updated : Dec 13, 2020, 12:23 PM IST

वाशिम - दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्री वाशिम तालुक्यातील तोंडगाव परिसरात जिओचा टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वाभिमानीच्या विजयाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांना याविषयी माहिती नाही.

...म्हणून जिओचे टॉवर जाळण्याचा प्रयत्न

हे जिओचे टॉवर वाशिम तालुक्यात तोंड गाव परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे व स्वाभिमानीच्या वतीने दिल्ली येथील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्यावतीने अदानी-अंबानींना मोठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून जिओचे टावर जाळण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या वाशिम येथील कार्यकर्त्यांनी केला असल्याची माहिती मिळत आहे.

'व्हिडिओविषयी माहिती नाही'

स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख व वाशिम जिल्हा अध्यक्ष दामोदर इंगोले यांनी यासंदर्भात सांगितले, की या व्हिडिओसंदर्भात मला माहिती नाही. व्हिडिओ वाशिमच्या असल्याची मला माहिती मिळाली आहे. मी कार्यकर्त्यांसोबत बोलत आहे. पण आमचा दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. पण नेमके हे आंदोलन कुठे झाले, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केले की इतर कोणी हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, व्हिडिओमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देत असल्याचे दिसते.

टीप -व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत खात्री देत नाही.

Last Updated : Dec 13, 2020, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details