महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचितची जनविकास आघाडीसोबत युती, जिल्हा परिषद १४ तर, पंचायत समितीच्या 27 जागांसाठी निवडणुक - जिल्हा परिषदेची निवडणुक बातमी वाशिम

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 आणि सहा पंचायत समितीच्या 27 जागांसाठी येत्या 19 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे निवडणुकीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने जनविकास आघाडीसोबत युती केली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा जनविकास आघाडीची युती
वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा जनविकास आघाडीची युती

By

Published : Jul 4, 2021, 5:28 PM IST

वाशिम - जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या 14, तर सहा पंचायत समितीच्या 27 जागांसाठी येत्या 19 जुलैला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे निवडणुकीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने जनविकास आघाडीसोबत युती केली आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 आणि सहा पंचायत समितीच्या 27 जागांसाठी येत्या 19 जुलै रोजी निवडणुक होत आहे. त्याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर

14 जिल्हा परिषदेवर व 27 पंचायत समितींसाठी निवडणुक

ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी महविकास आघाडीसोबत वंचित आघाडी वाशिम जिल्हा परिषदमध्ये सत्तेत होती. मात्र, आता नव्याने 14 जिल्हा परिषदेवर व 27 पंचायत समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणूकीत वाचिंत व जनविकास आघाडी यांनी एकत्र लढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सत्ताधारी महविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

वंचित आणि जनविकास आघाची युती

या पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच जागेवर वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा जनविकास आघाडीची अधिकृत घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर यांनी केली आहे. ते येथे आजोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा जन विकास आघाडीचे नेते अॅड. नकुलदादा देशमुख उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details