महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

४५ वर्षीय स्वयंपाकी महिलेच्या हत्येप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा - वाशिम गुन्हेवार्ता

वाशिम येथील माउंट कारमेल इंग्लिश स्कूलच्या परिसरात १३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी आपणाजी सरदारने वनमाला कांबळेच्या डोक्यावर घातक शास्त्राने वार करून तिला ठार केले होते.

४५ वर्षीय स्वयंपाकी महिलेच्या हत्येप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा
४५ वर्षीय स्वयंपाकी महिलेच्या हत्येप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा

By

Published : May 20, 2020, 11:44 PM IST

वाशिम - येथील माउंट कारमेल इंग्लिशस्कूलच्या परिसरात ४५ वर्षीय स्वयंपाकी महिलेची घातक शस्त्राने निर्घृण हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शशांक मनोहर मेनजोगे यांनी आज दिलेल्या निकालात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

राज्यातील लॉकडाऊन काळात पहिला निकाल असल्याचे बोलले जात आहे. वाशिम येथील माउंट कारमेल इंग्लिशस्कूलच्या परिसरात १३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी आपणाजी सरदारने वनमाला कांबळेच्या डोक्यावर घातक शास्त्राने वार करून तिला ठार केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details