महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून अमरनाथ यात्रेचा देखावा - अमरनाथ यात्रा बातमी

वाशिममध्ये महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून पांडुरंग बेंद्रे यांनी अमरनाथ यात्रेचा देखाव तयार केला आहे. देखावा पाहण्यासाठी जवळपासच्या गावातून लोक गर्दी करत आहेत.

महालक्ष्मी सणा निमीत्त वाशीममध्ये अमरनाथ यात्रेचा देखावा

By

Published : Sep 7, 2019, 9:50 AM IST

वाशिम -वर्षातून एक महिनाच सुरू असणारी अमरनाथची यात्रा म्हणजे भाविकांची अपार श्रद्धा असलेले पवित्र तीर्थक्षेत्र. जीवाची तमा न बाळगता भाविक या यात्रेत सहभागी होतात. मात्र, यंदाच्या यात्रा सुरक्षेच्या कारणाने रद्द करण्यात आल्याने भाविकांना अर्ध्यातूनच परतावे लागले. भाविकांची ही अपूर्ण राहिलेली इच्छा वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथील पांडुरंग बेंद्रे यांनी महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

महालक्ष्मी सणा निमीत्त वाशीममध्ये अमरनाथ यात्रेचा देखावा

पांडुरंग बेंद्रे यांनी आपल्या घरी स्थापन केलेल्या महालक्ष्मीच्या समोर चक्क अमरनाथ गुफेचा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी जवळपासच्या गावातून लोक गर्दी करत आहेत. या देखाव्यातून साक्षात अमरनाथाचे दर्शन झाल्याची अनुभूती भाविकांना होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details