वाशिम - मालेगाव येथील शिवराज हेल्थ क्लबच्या वतीने विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. युवा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेमध्ये अमरावती येथील विजय भोयर हा शिवराज विदर्भ श्रीचा मानकरी ठरला.
शरीरसौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर 'विदर्भ श्री' - 'विदर्भ श्री'
मालेगाव येथील पंचायत समितीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वयोगटानुसार एकूण ५ गट पाडण्यात आले होते
विजय
मालेगाव येथील पंचायत समितीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वयोगटानुसार एकूण ५ गट पाडण्यात आले होते. ६० च्या आतील गट ६५, ७०, ७५ आणि त्यापुढील एक खुला गट असे गट पाडण्यात आले होते.
प्रत्येक गटात एकूण ५ बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्या सर्व गटाच्या विजेत्या खेळाडूंमधून विदर्भ श्री हा किताब अमरावती येथील विजय भोयार यांना देण्यात आला. बेस्ट पोझरचा किताब सुयश जेडीया अकोला यांना मिळाला.